Farmer Producer Organization (FPO) सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांची सामूहिक ताकद निर्माण करणे हा आहे.
लहान व मध्यम शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, उत्पादनावर प्रक्रिया (क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग) करून मूल्यवर्धन व्हावे आणि थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचवता यावा, यासाठी एफपीओ उपयुक्त ठरते. सामूहिक खरेदीमुळे बियाणे, खते, औषधे कमी दरात मिळतात तसेच कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस, वेअरहाऊस यांसारख्या सुविधा सामायिक वापरता येतात.
एफपीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, यंत्रसामग्री व कौशल्य प्रशिक्षण मिळते. बँका, नाबार्ड व सरकारकडून आर्थिक सहाय्य व अनुदाने सहज मिळतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा नफा थेट शेतकरी सदस्यांनाच मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान सुधारते.
श्री महागणपती अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही 2015 साली स्थापन झालेली संस्था असून तिचे मुख्यालय सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ठानापुडे येथे आहे. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रक्रिया व पॅकेजिंग सुविधा पुरवणे, तसेच ग्रामीण विकास व रोजगारनिर्मिती करणे हेच कंपनीचे मुख्य ध्येय आहे.
संचालक मंडळ
1) श्रीधर शिवाजी गायकवाड
2)नयन संजय पाटील
3)सुभाष दत्तात्रय पाटील
4)सुभाष रंगराव पाटील
5)अमर विलास पाटील
6)वैशाली शिवाजी पवार